Popular Posts

Tuesday, January 4, 2011

डायरीच्या (खरडलेल्या) शेवटच्या पानांतून.

"आहो, बहुतेक नळ बंद करायचा राहून गेला वाटत हो...!!!"

दोना पौला च्या शांत समुद्रकिनारवर एक कर्तव्यदक्ष गृहिणीचे चिंतातुर उद्गार ऐकून मी विचारातून बाहेर आलो.
"६.३० PM , २ जानेवारी २०११"
घड्याळ नेहमी आपला कम करत रहत. आपल्याला आवडो अगर न आवडो. संधिप्रकाश संपून हवेत गारठा भरायला लागला होता. मी मात्र अजुन माझ्या विचारत होतो. मागचा संपूर्ण आठवडा माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता.

"१ जानेवारी को NIO Foundation Day हैं, उसमे हमको mime करने का मौका मिल रहा हैं. चालो ना participate करते हैं..!!" माझा मित्र अवनीश २५ डिसेंबरच्या संध्याकाळी असाच काहीतरी बडबडत होता. आम्ही सगळे कट्ट्यावर गप्पा मारत असताना ह्याला सकाळी कोणीतरी mime साठी विचारल्याची आठवण झाली होती. सगळे थोडे light मूड मध्ये असताना साहेबांनी डोक्यात खूळ घेतला होतं. सगळी gang दिवसभर क्रिकेट खेळून दमली होती त्यामुळे कोणीच पटकन reaction देण्याच्या अवस्थेत नव्हत. थोडं हो, नाही, बघू, वगैरे अस्सल भारतीय प्रतिक्रिया देऊन झाल्यावर ठरलं, कि चला जाऊन पाहू तरी कि काय भानगड आहे ते.



२५ डिसेंबर, गोव्यात क्रिसमस फिवर जबरदस्त असतो. मला कल्पना नव्हती की मलाही ह्या वर्षी क्रिसमस एन्जोय करायला मिळेल म्हणून. ह्या वर्षी विद्यापीठातील माझ्या department च्या M . Sc . I मध्ये एक जर्मन student आली आहे. तिचं नाव कार्ला. मी स्वतः कधी जुनियर सिनियर अश्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे नवीन मित्र-मैत्रिणी जोडायला कधीच अडचण आली नाही. तशीच कार्लाशीही मैत्री झाली. हळू हळू जुलिया, स्टेफीन पण दोस्त झाले. तर हि सगळी मंडळी, आणि कार्लाची family ह्या क्रिसमस ला गोव्यात आले. मी पण research साठी गोव्यात असल्याने त्यांच्याकडून आग्रहाचं निमंत्रण मिळाल. २५ डिसेंबर खरचच rocking होता. सकाळी बोट रायडींग, दुपारी जर्मन पद्धतीचं जेवण (अर्थतच शाकाहारी) आणि संध्याकाळी गिफ्ट्स. माझ्याच देशात पाहुण्यांकडून मिळणाऱ्या प्रेमळ पाहुणचाराने मी भारावून गेलो होतो. वागातोर पासून NIO colony मध्ये यायला रात्रीचे ८.३० झाले होते; आणि आल्यावर mime नावाचा प्रकार करण्यासाठी निमंत्रण मिळालं होत.असा समाधानयुक्त थकवा घेऊन मिमेम्हन्जे काय ते समजून घ्यायला गेलो....
 

"अब mime में आपको सिर्फ facial expressions से अपना topic present  करना होता हैं. mime मतलब मूक अभिनय. No voice , & नो words ; nothing  artificial ". आमचा director बनलेला श्रीराम सांगत होता. अस्सल दक्षिणात्य कुरळे केस, रुंद कपाळ, मोठे डोळे आणि बोलण्यात दक्षिणी हेल काढून बोलायची सवय! डिरेक्टर म्हणून श्रीराम चांगला होता. त्याचं वागणं बोलणं व्यक्तिमत्वातील संतुलित मनाची ग्वाही देत होतं. श्रीराम ८ वी पासून mimes करतोय. आमच्यातील बेस्ट काढून घेण्यात श्रीराम तरबेज होता. आता खरी समस्या होती ती तयारीसाठी वेळ काढण्याची. सगळे हॉस्टेलवरच राहतात तरीपण प्रत्येकाला त्याच्या त्याचा lab मध्ये भरपूर काम असत. म्हणून वेळ कधी केव्हा मिळेल सांगता येत नाही. पण theme छान होती. शेतकऱ्यांच्या जीवनावर अभिनय असल्यामुळे त्यातील खरेपणा दाखवायला प्रत्येक जण जीव तोडून मेहनत घेत होता.

स्क्रीनिंग करून आम्हाला रोल दिले गेले. मला शेतकऱ्याचा रोल मिळाला तो मी विष पिऊन मरण्याची अक्टिंग छान करतो म्हणून. मी खुश! आता लक्षात येतंय कि मी जर कशावर जास्त मेहेनत घेतली असेल तर त्या शेतकऱ्याची आत्महत्या प्रभावीपणे दाखवण्यावर. theme सादर करायला आम्हाला फक्त ९ मिनिट होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात काम करणं, वादळी पाऊस येऊन पिक नष्ट होणे, सावकाराकडून कर्ज घेणे, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणे आणि पिक हाताशी येताच सावकाराची दादागिरी, आमचा शेतमाल हिसकावून नेणे आणि हताश शेतकऱ्याची आत्महत्या इतकं सगळं दाखवायचं होतं. रंगमंचावर अभिनय करताना तोंडाला पूर्ण पांढरा आणि डोळ्याभोवती काळा रंग लावण्यात येणार होते जेणेकरून चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे दिसून येतील.

३१ डिसेंबरला मित्रांसोबत जेवण करून दोन पौलाच्या जेट्टीवर आतिषबाजी पाहायला गेलो होतो. सोबत गप्पा, चेष्टा, मंद सुरातील गाणी  आणि समोर आतिषबाजी ह्यांच्या साथीत 2010 ला निरोप दिला. का माहित नाही पण दर वर्षी ३१ डिसेंबरला मन जसं संपूर्ण वर्षाची time-travel  करून  येत तसं ह्यावेळी वाटलं नाही. कदाचित tv नावाच्या वस्तूपासून महिनाभर दूर असल्याचा परिणाम असावा.


१ जानेवारी NIOFoundationDay  असतो. सणाचा उत्साह, अभिनंदनाचा वर्षाव, आणि सगळ्यांनी एकत्र काम करताना काळजीपूर्वक जपलेलं team स्पिरीट, असं वातावरण मला आधी कोणत्याच lab मध्ये दिसला नव्हतं.संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, fun games  आणि शेवटी dinner . Perfect ....!!

स्टेजवर परफॉर्मकरताना काहीच जाणवलं नाही. माझ्या रोलमध्ये शिरल्यावर acting  कशी झाली माहित नाही, पण शो छान झाला इतकं नक्की. श्रीरामची शेवटची कॉमेंट मला सगळं काही देऊन गेली. "अरे where is that fellow Damodar ? "Since he committed sucide ,  I couldn 't stop crying , man ...!!"


"शेवटी कोणी पाणी भरलं माहित नाही, पण बहुतेक नळ चालू होता आपण निघालो तेव्हा.."

अजून पाणी प्रश्नावर काही ठराव पास होत नव्हता. मानवी मन पण अजब आहे.  समोर इतकं अथांग समुद्र पसरलेला असून घरातील पाण्याच्या नळाची किती काळजी वाटावी...!! आणि असेच विचार घरापासून लांब आल्यावरच यावेत ह्याचं काय कारण?? माहित नाही. ७.३० कधी वाजून गेले मलाच समजलं  नाही. चला वर्षाची सुरवात तर छान झाली....बघू आता शेवट कसा होतोय........?

NIO ची मुख्य इमारत .

(Special thanks to Ajay, my friend who clicked them all)

2 comments:

  1. Nice to read ur new year celebration ! For sure, u can say that "UR YEAR STARTED WITH BANG!".....keep it up buddy!

    ReplyDelete
  2. Dear, Chhan lihitos.. pan he varsha 2011 ahe ani atta apan 2010 la nirop dilay raja...!! :)

    ReplyDelete