Popular Posts

Thursday, October 6, 2011

“Divide & Rule Policy” of the Climate Era


मराठी लेखाला इंग्रजीतलं शीर्षक पाहून थोडं विचित्र वाटेल पण डर्बन इथे होणाऱ्या परिषदेसाठी वर्णन करायला माझ्याकडे दुसरं चपखल शीर्षक नाही. United Nations Convention on Climate Change अंतर्गत असलेला “क्योटो प्रोटोकॉल”, त्याच्याद्वारे आलेली राष्ट्रांची वर्गवारी आणि एकूणच जगात ह्या विषयावर साड्यांच्या दुकानात पण होणार नाही इतकी चाललेली घासाघीस सर्वश्रुत आहेच. पण साड्यांची २३ दुकानं फिरून, वाटाघाटी करून झाल्यावर एखाद्या तरी पुण्यवान वाण्याच्या दुकानात खरेदी होते; इथे मात्र action on climate change ला no buyers! प्रत्येकचं वेगळच रडगाणं. आणि एकवेळ ते ही परवडलं, पण मागचं जवळजवळ एक तप हे असं साटं-लोटं करून पण त्यातून भरीव असं काही निष्पन्न मात्र अजिबात होत नाही. अजून पण आम्ही वातावरणात वाढलेलं कार्बनचं प्रमाण माणसामुळे कसं नाही हे सिद्ध करण्यात धन्यता मानतो आणि त्यापेक्षा पण उद्दामपणा म्हणजे समोर असलेल्या ह्या समस्येसाठी ठोस कृती करायचं तर अजिबात नाव घेत नाही. इथे आम्ही चा अर्थ आता भारतीय असा होत नाही...ही गोष्ट व्यापक आहे आणि आपण सगळे (आणि अगदीच हट्ट करू लागली, तर आपली सरकारे) ह्यात अंतर्भूत होतो.
पार्श्वभूमी-
हे सगळं अत्याधुनिक रामायण सुरु व्हायला रियो-दि-जानेरो इथल्या १९९२ ची वसुंधरा परिषद कारणीभूत ठरली. (खर सांगायचं तर मलाच आता दर वेळी ह्या विषयावर बोलताना सत्यनारायणाची कथा पारायण करतोय असा भास होऊ लागलाय. सगळे details, सगळ्याची पार्श्वभूमी तीच पण अजून त्यात नवीन भरीव असं काहीच नाही. अर्थात मनाची उद्विग्नता, हाताशपणा काही संपत नाही हा भाग वेगळा.) १९९७ ला क्योटो प्रोटोकॉल स्वीकारला गेला आणि २००५ पासून तो अमलात आला. २००८-२०१२ हा “1ST Commitment Period” मानला गेला ज्यामध्ये ज्या देशांना उत्सर्जन कमी करण्याची targets दिलेली आहेत त्यांनी पटापट शहाण्यामुलासारख आपली उत्सर्जन कमी करण बंधनकारक करण्यात आला होतं. पण दर वर्षी नवीन नवीन गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि आता २०११ संपत आलं तरी कुणी किती काय काय कमी केलं ह्याचा ठोस अहवाल नाही आणि त्याहून पण सॉलिड प्रकार म्हणजे दात काढून काही देशांना दमदाटी करायची कि बऱ्याबोलानं तुम्ही पण emission reduction targets स्वीकारा नाहीतर आम्ही सगळ्यालाच लाथ मारून निघून जाऊ... मग कुठलं climate change  कुठली historical responsibility आणि कुठले आलेत “real, measurable & additional emission reductions! आणि हे सगळं वाटत, दिसत तितकं साध सरळ नाहीये. बऱ्याच गुंतागुंती, आंतरराष्ट्रीय राजकारणातील चोर वाटा आणि “तुला नाही, मला नाही घाल कुत्र्याला” ही नीती स्पष्टपणे दिसून येते. ह्याला जबाबदार कोण असा विचारलं तर तुमचं उत्तर तुमचं राष्ट्र क्योटोच्या कोणत्या गटात आहे ह्यावर बऱ्याचदा अवलंबून असतं. अर्थात अनेक सन्माननीय पत्रकार, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते स्पष्ट आणि परखड बोलतात हा मुद्दा पण दुर्लक्षित करून चालणार नाही. पण मुख्य निर्णय घेणाऱ्या समित्या आणि परिषदेमधून त्यांना व्यवस्थित बाजूला ठेवलं जातं. आणि सगळे निर्णय हे त्या त्या देशाच्या जगातील ताकातीनुसार बदलतात आणि बदलले जाऊ शकतात. आजवर झालेल्या COPCMP परिषदांचे निकाल पहा.
सकारात्मक बाजू-
तसं पाहिलं तर मुळातच क्योटो प्रोटोकॉल मध्ये खूप चांगल्या तरतुदी आहेत ज्याद्वारे उत्सर्जन कमी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. उदाहरणार्थ, CDM (Clean Development Mechanism) Annex I मधील राष्ट्रांनी (ज्यांना उत्सर्जन कमी करण्याचे बंधन आहे) अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांकडून UNFCCC प्रमाणित CER (Certified Emission Reductions) खरेदी करणे..ज्यामुळे प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या राष्ट्रांना प्रदूषण नं केल्याबद्दल एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आणि विकसित राष्ट्रांना आपलं उत्सर्जन कमी करण आर्थिकदृष्ट्या आवश्यक होऊन बसतं. किंवा JI (Joint Implementation) ज्यामध्ये दोन Annex I राष्ट्रे एकत्र येऊन ज्या देशात emission reductions ची किंमत कमी आहे तिथे emission reductions चा प्रकल्प राबवतात. आजवर असे अनेक प्रकल्प झालेले पण आहेत. UNFCCC च्या संकेतस्थळावर अश्या प्रकल्पांची यादी दिलेली आहे. चीन आणि भारत CDM projects मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उठून दिसतात.
पण-
सुरवातीला म्हणल्याप्रमाणे सगळं दिसतं तसं छान आणि सरळ नाहीये. चीन आणि भारतात CDM मधून खूप पैसा जातोय हे लक्षात आल्यावर विकसित राष्ट्रांनी ओरड सुरु केली की चीन भारतासारख्या राष्ट्रांकडे पण proven ability आहे उत्सर्जन कमी करण्याची. शिवाय संख्याशास्त्र पण सध्या ह्यांच्यावर रुसून आहे. विकसित राष्ट्रांकडून कांगावा सुरु झाला, की ह्यांची आर्थिक प्रगती पहा, ती मोठ्याप्रमाणावर (?) औष्णिक उर्जा प्रकल्पांमधून मिळणाऱ्या उर्जेवर अवलंबून आहे (ज्यामुळे मोठ्याप्रमाणावर CO2 होतात). तेव्हा त्यांनी पण emission targets घ्यायला हवीत नाहीतर सगळाच अट्टाहास व्यर्थ आहे ! वास्तविक पाहता एकट्या अमेरिकेचं उत्सर्जन चीन भारत आणि जपान यांच्या एकत्रित उत्सार्जांपेक्षा खूप जास्त आहे. पण Miss. Cat च्या गळ्यात bell कोण tie करणार. मग चीन आणि भारत ह्यांनी पण मोठ्या माननी स्वताहून उत्सर्जन कमी करण्याची बंधनं घालून घेतली.. त्यांनी आपापल्या सरकारी gazette वर लिहून दिलं की आम्ही आमच्या परीनं जितकं जमतं तितकं करू. चीन म्हणाल आम्ही २५-४० % उत्सर्जन २०२० पर्यंत कमी करू. भारताला पण २०% उत्सर्जन आपण कमी करू शकू २०२० पर्यंत असा विश्वास वाटू लागला. झालं. आता वाटू लागलं संपल्या सगळ्या कटकटी. पण नाही. विकसित राष्ट्र म्हणू लागली छे छे, हे असा कुठे असतं का राव. आम्ही आपलं targets स्वीकारायची आणि तुम्ही मात्र उगीच कागदावर काहीतरी लिहून आमच्या तोंडाला पानं पुसायची. ही cheating आहे. ते काही नाही तुम्ही पण targets स्वीकारा.
हे सगळं इथेच थांबलं नाही. पुढे जाऊन त्यांनी Annex B राष्ट्रांची वर्गवारी केली. Small Island States, Least Developed Countries वगैरे. आणि सांगितलं की आता उत्सर्जन कमी करण्यासठी, efficient technologies साठी लागणारी आर्थिक मदत फक्त त्याच देशांना दिली जाईल. थोडक्यात चीन आणि भारताला CDM द्वारे मिळणारा फायदा त्यांना बंद करायचा होता. तसं पाहायला गेलं तर हे सगळे देश वातावरणातील बदलामुळे मोठ्याप्रमाणावर प्रभावित होणार आहेत. त्यांना विकसित राष्ट्रांनी ‘चीन-भारत ह्यांनी जर emisssion reduction targets घेतली तर आम्ही तुम्हाला मदत करू’ हे गाजर दाखवलं आणि ते ही तयार झाले.
पुढे काय-
आता जर गेल्या जवळ जवळ १० वर्षांवर नजर टाकली तर लक्षात येईल विकसित राष्ट्र जे काही बोलली त्यातलं फार काहीच करायची तसदी त्यांनी घेतलेली नाही. आत्ता चालू असलेला खेळ म्हणजे आजच काम उद्यावर ढकलण्याचा प्रकार आहे. कदाचित त्यांची तयारी पण नसेल काही करायची. पण मुळात क्योटो प्रोटोकॉल च्या नंतर काय? Second commitment period कधी असणार (आत्तापासूनच 1st आणि 2nd commitment period मध्ये gap असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे)? त्याच स्वरूप काय असणार? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे २००८-२०१२ मध्ये ज्यांनी उत्सर्जन कमी करण अपेक्षित होतं त्यांनी काय केलं? डर्बन परिषदेत काय होईल सांगता येत नाही (ह्याचा सकारत्मक अर्थ खूप कमी आहे). ह्या परिषदेतून खरं तर काहीच ठोस निष्पन्न होणार नाही. युरोप आणि अमेरिकेत चलू असलेली आर्थिक मंदी सध्या तेजीत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सोसून उत्सर्जन कमी करायच्या मागे कुणी लागेल का हा खरा प्रश्न आहे. पण चीन आणि भारतानी जर emission reduction targets स्वीकारली तर आश्चर्य वाटायला नोको. पण तरीही ह्यातून काही मार्ग निघेल का ह्याबाबत संधीग्द्गता कायम आहे.
काहीही झाल तरी वातावरणातील कार्बन उत्सर्जन ह्या एकाच विषयावर काही निर्णय आणि ठोस कृती व्हायला इतका वेळ लागतोय तर पृथ्वीच्या बाकीच्या बदलांच काय करणार. त्यावर कधी उपाययोजना करणार ह्यावर काहीच उत्तर नाही.

Sunday, April 17, 2011

शब्दांचा कॅनव्हास कमी पडतो

शब्दांचा कॅन्ह्वास कमी पडतो.....

एकीकडे आई बाबाना मुकलेली अस्तित्वच हरवून गेलेली जपानमधली मुल पाहून

स्वार्थी आपमतलबी माणसांचा हिशोबी व्यवहार पाहून

आयुष्यातली न सुटणारी कोडी पाहून

मोकळेपणाच्या नावाखाली चाललेले अचकट व्यवहार पाहून

आसुसलेलं प्रेम गमावताना पाहून

शब्दांचा कॅनव्हास कमी पडतो.........

पापण्या फक्त झरत राहतात...

त्यांना कुठे कळतं कुठे थांबावं..

शब्दांचा कॅनव्हास कमी पडतो

Tuesday, March 1, 2011

(मला शीर्षकच सुचत नाही)

कानात कोंबून घुसवलेल्या इयर फोनमधली दणक्यात वाजणारी गाणी, बाजूला असलेल्या A/C आणि GC-MS ची घरघर आणि डोक्यात उडालेला विचारांचा प्रचंड गोंधळ..... रविवार रात्रीचे ११ वाजलेले आणि संपूर्ण जग weekend मनसोक्त जागून पुढच्या आठवड्याची स्वप्नं कुशीत घेऊन झोपायला गेलेलं असतं आणि मी lab मध्ये अजून काही राहिलेल्या गोष्टींवर मेहनत घेत असतो. मागच्या ४ आठवड्यातली तीच process पुन्हा करण्याची हि माझी ४ थी वेळ. मन सांगत असतं "DON'T GIVE-UP ", आणि शरीर खोडकर मुलासारखं "त्यातून काही short-cuts काढता येत असतील तर बघ....अजून कितीदा अपयश स्वीकारणार आहेस???" म्हणून खिजवत असतं. मनाच्या आणि शरीराच्या ह्या संगमावर बसून मी आपला "ह्यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघत असेल...फक्त माझी नजर तिथे असली पाहिजे" म्हणत पुन्हा प्रयत्न करण्याची माझी नाव हाकत राहतो.

आता मुळातच माझ्या argument  मध्ये एक मलाही न समजलेलं कोड दडलाय...आपल्याच मनाचे सकारात्मक आणि नकारात्मक अशे दोन प्रकार असतील तर मग निर्णय घेणारा कोणता भाग??? आणि मग "मी" नावाचा जो कोणी असतो तो कोण???? म्हणून मी त्याला माझ्या सोयी साठी मन आणि शरीर अशी नावं दिलीयेत.... इथे मला "Angels & Demons" चित्रपटाचं banner आठवतंय (चित्रपट मूळ कादंबरीच्या दर्जाच्या जवळपासही फिरकत नाही पण हे चित्र माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलंय.) माझा लाडका अभिनेता Tom Hanks (त्यानं साकारलेलं माझा अतिशय आवडतं  पात्र म्हणजे Robert langdon ) देवदूत (Angels ) आणि सैतान (Demons ) ह्यांच्या मध्ये उभा राहिलाय आणि त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे प्रचंड मोठे भाव आहेत. मला राहून राहून वाटत राहत कि ते चित्र म्हणजे मानवी जीवनातील  सदैव  चालणाऱ्या  द्वंद्वाच  प्रतिक  आहे  कि काय. कदाचित angels, demons, चांगल, वाईट, प्रेम संताप वगैरे असं काहीच नासावं. गोष्टी फक्त असतात....चांगल्या वाईट वगैरे लेबल आपण त्याना लावतो....पण शेवटी काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा हे ठरवणारा फक्त माणूसच असतो. आणि त्याला त्या त्या मार्गावरून चालण्याची बक्षिसं आणि फळं दोन्ही निमुटपणे भोगायची असतात.

आत्ता हे लिहिताना पण माझ्या अंगावर काटा उभा राहतोय आणि मनात कुठेतरी सुधीर फडकेंनी गायलेलं गीत रामायणातला  "दैव जात दुखे भरता...दोष न कुणाचा...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..दोष न कुणाचा" हे गाणं फुल volume वर प्ले होतंय. हे गाणं मी आजवर निदान १०० हून जास्त वेळा ऐकलय पण त्याची गोडी काही संपत नाही......कदाचित आयुष्यात मला स्वतालाच ह्या ओळींचा अनुभव आला असल्याने हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असेल.....माहित नाही... पण खरच वाटतंय कि आयुष्य कितीही सकारात्मक पद्धतीने जगू ..निराशेचा लवलेशसुद्धा येऊ देणार नाही म्हणलं तरी बऱ्याच प्रसंगात त्रास होतो...मन मारून पुढे जावं लागतं आणि "माझी काहीच चूक नसताना हे असंच का" चं उत्तर सापडत नाही....आणि मग आयुष्याचा प्रवास एक कठोर शिक्षा वाटून जातो. कदाचित तेव्हाच निष्काम कर्मयोगाची महती समजू लागते...आनंद आणि दुखाकडे सारख्याच नजरेने आणि तीव्रतेने पाहत...DETACHED होवून आयुष्य कसं जगता येतं ते हळू हळू समजत जातं. म्हणलं तर मानवी जीवन दुख, अपयश, निराशा, अपेक्षाभंग ह्यांच्यासारख्या काट्यांनी खच्चून भरलंय. पण त्यातून सुद्धा हास्य, समाधान आणि जीवनाकडे पाहण्याचा आनंदी दृष्टीकोन घेऊन जीवनात आनंदाचे निदान ताटवे तरी नक्कीच फुलवता येऊ शकतात.....पण त्यातही प्रयत्न करत राहणं हेच माणसाच्या हातात आहे हे हि तितकच खरं.

आता मी परत माझ्या मूळ प्रश्नाकडे येतोय.."मी" म्हणजे कोण???????????????????????

आजवर शिकलेली  Cell & Molecular Biology, Embryology, Genetics तोकडी पडते, बुद्धी हताशपणे "No results found on the query you entered" चा message flash करते. आणि मी पुन्हा भगवत गीता उघडतो. Proteins, Fats, Lipids, DNA, Water ह्यांनी बनलेला एक organized human being.....product of 4.5 millions of evolution हि व्याख्या मुस्कटात मारावी तशी फाडकन डोक्यात येते पण समोर भगवत गीता तर आत्म्याचं अस्तित्व, "नैनं चिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः...नाचैनाम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः" अश्या शब्दात वर्णीत करत जाते.....(असंभव serial चा title track मला आवडण्याचा आणखी एक कारण...तसाही पल्लवी जोशी चा मी अशक्य fan असल्याने तिनं केलेलं काहीही मी वेड्यासारखा पाहायचो....असो ते एक वय होता ज्यात अश्या सगळ्या गोष्टी करायच्याच असतात...नाहीतर पाप लागतं......असो, तर, चावटपणा पुरे झाला.) पण हे जे व्यक्त न करता येण्याजोगं पण स्फुट असं अस्तित्व असतं त्यालाच कदाचित "मी" म्हणत असावेत असं मला वाटतं. आणि ह्या त्याच "मी" ला आपण Commander-in-charge बनवलेलं असतं...आता हा "मी" त्या "परमेश्वर" नावाच्या गोष्टीसोबत तादात्म्य पावलेल्या अवस्थेत, सुख दुखाकडे समान नजरेने पाहत, सदैव राहावा इतकंच वाटत राहत. ह्यातूनच मला उमगलेल्या निष्काम कर्माचा पहिला अध्याय सुरु होतो.....

Enhanced by ZemantaEnhanced by Zemanta 

Saturday, February 26, 2011

Why does life suck sometimes.........???????????


I've a question- as always- why are there so many depressing moments in our life? Why people are so harsh to you sometimes even if your mistake is vary small one? Why things don't always seem to be falling in place even though you try &; give your 200%? I remember a nice song from a Hindi movie (i forgot the name). The lyrics goes like
"Ishwar allah tere jahaan mein nafarat kyun hai jang hai kyun...tera dil to itna bada hai..insaan ka dil tang hai kyun??....Kadam kadam par sarahad kyun hai sari jameen toh teri hai....is duniyan ke daman par insaan ke lahu ka rang hai kyun??...."

The song goes on &; never fails to mesmerize me or should I say never fails to take me in the Contemplation mode!! Like the still scenes from a movie, many images slid in front of me. What is there in it?? Many occasions at which I was beaten up, not because of my fault but somebody Else's, many times when somebody- with whom I had no issues at all- seems to talk like settling some personal scores with me &; I couldn't do a damn to him, those moments when I wished for hearing for something positive & god made me hear quintessential negative things & NOs, all those memories of sad moments when I felt like being dragged by life (which is so unusual to me) to just nowhere (or in the trench of sadness- if at all somewhere).


I think..... at those moments, god or thermodynamics, whatever you like to call, wants me to go through those tough roads so that  I'll get more stronger by the end of those roads. The tears I shed, would return to me becoming the sweet pools of water to energise me back.

Moreover, I feel that at times when life sucks, pat your own back at times when you do small but good things & avoided the path of sins, &; cruelty. You might have done small thing-no matter how small- never forget to cheer yourself up. You know, when our mind makes us do wrong things, sins, we feel guilty &; scold our mind. But do you remember the occasions when you had done something good, some charity, showed some compassion had you congratulated yourself up for not choosing to do opposite of it?? If no, start it from now on, because you are reading a good blog instead of something bad on the Internet which can also be as easily accessible as this blog.

And lastly, about depressing moments, learn what the crux of the matter that time wanted to teach you, talk to someone you love the most, forget those people &; moments which spoiled your life, rather wish them all the best &; take on your life with a new energy. The life will be very beautiful.

(I would like to mention with all the humility & modesty that this is easier said than done)

God bless you...!!!!

Saturday, January 29, 2011

विचार....

बरेच दिवस झाले डोक्यात एक विचार फार ताप देतोय....माणसाला विचार आणि स्मृती ह्यांची खरच किती गरज असते.........? आणि जर त्या नसतील तर काही मोठा फरक पडणार आहे का?

काही दिवसांपूर्वी "50 फस्ट डेट्स" चित्रपट पहिला...खरं सांगतो, चित्रपट इतका अप्रतिम आहे कि अंगावर रोमांच उभे राहावेत किंवा डोळ्यातून पाणी यावं....मराठी चित्रपट "गोजिरी" पहिला असेल तर कथानक लक्षात येईलच....एका अपघातात short term memory loss  झालेली तरुणी आणि तिचा मनापासून सांभाळ करणारे तिचे नातेवाईक ....तिच्या मनापासून प्रेमात पडणारा नायक जो तिला भेटण्या आधी नाती..प्रेम...आणि एकंदरीतच स्त्रियांकडे मजा म्हणून पाहणारा आणि हि आयुष्यात आल्यानंतर तिला रोज आपल्या प्रेमात पडणारा (आणि पाणावलेल्या आपल्या  डोळ्यांच्या कडातून मनापासून येणारी आपली दाद घेऊन जाणारा) खराखुरा नायक...आणि अशक्य वाटावं इतकं त्या दोघांचं एकमेकांवरच प्रेम...


चित्रपट संपतो आणि माझ्या ओल्या पापण्याच्या अडून एक मनाचा प्रवास सुरु होतो.....मानवी मन, त्याच्या अनेक कडा, मानवी भावना, नाती आणि सरते शेवटी विचार आणि स्मृती ह्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान ह्यापाशी येऊन हा प्रवास थांबतो ... मी तशाच काहीशा न सावरलेल्या अवस्थेत ह्या मोठ्या jig saw puzzle ची मांडणी करायला लागतो....आता पुढे काही लिहित जाणार आहे त्याला काही निश्चित आणि मानवी चौकटीत बांधलेला निष्कर्ष येणार नाही पण मनात खूप विचार आले कि ब्लॉग लिहिणं सोयीस्कर वाटतं.

एक समाज, त्या सोबत येणारी आचार विचारांची चौकट, आणि दुर्दैवाने त्यासोबत येणारी बंधनं जी माणसाचं अख्खं जीवनच जखडून टाकतात...ह्या सगळ्याचा उगम माणसाच्या विचार करण्याच्या आणि स्मृती साठवण्याच्या प्रकृतीशी संबंधित आहे कि काय अशी शंका येते...काही स्मृती खरच निघून गेल्या तर छानच वाटणार असतं....नव्हे  कधी कधी तर काही स्मृती जपण्यापेक्षा फेकून दिलेल्या चांगल्या इथवर मनाची मजल गेलेली असते....आणि विचारांबद्दल काय बोलू...इतक्या प्रकारचे आणि अनंत ताऱ्हांचे विचार माणूस म्हणून आपल्या आयुष्यात असतात कि कधी कधी शंका येते कि माणसाचं जीवन कृतींपेक्षा विचारांनीच भरलेलं आहे काय...?????

ह्या दोन्ही गोष्टी मानवी जीवनातून वजा केल्या तर आयुष्य निदान "झेपेल" तरी..अर्थात मला इथे विचार आणि स्मृती गेल्यावर येणारा स्वैराचार अभिप्रेत नाही हि गोष्ट वेगळी.....पण तरीही पोकळी आणि धुंदी ह्या आपल्यातून कायमच्याच निघून जातील......नवीन वयात आलेल्या मुलाला (ज्याला अजून तारुण्य उपभोगायच म्हणजे काय हे पण समजलेलं नसतं) त्याच्या भावी करियरबद्दल बोलताना ऐका म्हणजे विचारांची आयुष्यावर बसलेली मगरमिठी जाणवेल.....आणि स्मृतींबद्दल काय सांगणार.....आपल्याला सोडून गेलेली मुलं त्यांच्या आयुष्यात आनंदात आहेत हे एकमेकांना अभिमानाने सांगणारे "एकटे" आई वडील पहा...

कधीकधी असं वाटत कि ह्या गोष्टी आयुष्यातून निघून गेल्या तर रोज एक "नवा" दिवस अनुभवता येईल...त्या दिवशी मिळणारा सुखद अनुभव, अपेक्षाभंगातून येणारी निराशा, यशाची धुंदी.....सगळं सगळं रात्री १२ च्या ठोक्याला संपून जाईल....आयुष्याच्या कधीच न कळणाऱ्या बेरजा वजाबाक्या फक्त त्या दिवसापुरत्या मर्यादित राहतील ....पण असं खरच होईल का????????? होणार नसेल तर can i at least have a delete button....?

Tuesday, January 4, 2011

डायरीच्या (खरडलेल्या) शेवटच्या पानांतून.

"आहो, बहुतेक नळ बंद करायचा राहून गेला वाटत हो...!!!"

दोना पौला च्या शांत समुद्रकिनारवर एक कर्तव्यदक्ष गृहिणीचे चिंतातुर उद्गार ऐकून मी विचारातून बाहेर आलो.
"६.३० PM , २ जानेवारी २०११"
घड्याळ नेहमी आपला कम करत रहत. आपल्याला आवडो अगर न आवडो. संधिप्रकाश संपून हवेत गारठा भरायला लागला होता. मी मात्र अजुन माझ्या विचारत होतो. मागचा संपूर्ण आठवडा माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता.

"१ जानेवारी को NIO Foundation Day हैं, उसमे हमको mime करने का मौका मिल रहा हैं. चालो ना participate करते हैं..!!" माझा मित्र अवनीश २५ डिसेंबरच्या संध्याकाळी असाच काहीतरी बडबडत होता. आम्ही सगळे कट्ट्यावर गप्पा मारत असताना ह्याला सकाळी कोणीतरी mime साठी विचारल्याची आठवण झाली होती. सगळे थोडे light मूड मध्ये असताना साहेबांनी डोक्यात खूळ घेतला होतं. सगळी gang दिवसभर क्रिकेट खेळून दमली होती त्यामुळे कोणीच पटकन reaction देण्याच्या अवस्थेत नव्हत. थोडं हो, नाही, बघू, वगैरे अस्सल भारतीय प्रतिक्रिया देऊन झाल्यावर ठरलं, कि चला जाऊन पाहू तरी कि काय भानगड आहे ते.



२५ डिसेंबर, गोव्यात क्रिसमस फिवर जबरदस्त असतो. मला कल्पना नव्हती की मलाही ह्या वर्षी क्रिसमस एन्जोय करायला मिळेल म्हणून. ह्या वर्षी विद्यापीठातील माझ्या department च्या M . Sc . I मध्ये एक जर्मन student आली आहे. तिचं नाव कार्ला. मी स्वतः कधी जुनियर सिनियर अश्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे नवीन मित्र-मैत्रिणी जोडायला कधीच अडचण आली नाही. तशीच कार्लाशीही मैत्री झाली. हळू हळू जुलिया, स्टेफीन पण दोस्त झाले. तर हि सगळी मंडळी, आणि कार्लाची family ह्या क्रिसमस ला गोव्यात आले. मी पण research साठी गोव्यात असल्याने त्यांच्याकडून आग्रहाचं निमंत्रण मिळाल. २५ डिसेंबर खरचच rocking होता. सकाळी बोट रायडींग, दुपारी जर्मन पद्धतीचं जेवण (अर्थतच शाकाहारी) आणि संध्याकाळी गिफ्ट्स. माझ्याच देशात पाहुण्यांकडून मिळणाऱ्या प्रेमळ पाहुणचाराने मी भारावून गेलो होतो. वागातोर पासून NIO colony मध्ये यायला रात्रीचे ८.३० झाले होते; आणि आल्यावर mime नावाचा प्रकार करण्यासाठी निमंत्रण मिळालं होत.असा समाधानयुक्त थकवा घेऊन मिमेम्हन्जे काय ते समजून घ्यायला गेलो....
 

"अब mime में आपको सिर्फ facial expressions से अपना topic present  करना होता हैं. mime मतलब मूक अभिनय. No voice , & नो words ; nothing  artificial ". आमचा director बनलेला श्रीराम सांगत होता. अस्सल दक्षिणात्य कुरळे केस, रुंद कपाळ, मोठे डोळे आणि बोलण्यात दक्षिणी हेल काढून बोलायची सवय! डिरेक्टर म्हणून श्रीराम चांगला होता. त्याचं वागणं बोलणं व्यक्तिमत्वातील संतुलित मनाची ग्वाही देत होतं. श्रीराम ८ वी पासून mimes करतोय. आमच्यातील बेस्ट काढून घेण्यात श्रीराम तरबेज होता. आता खरी समस्या होती ती तयारीसाठी वेळ काढण्याची. सगळे हॉस्टेलवरच राहतात तरीपण प्रत्येकाला त्याच्या त्याचा lab मध्ये भरपूर काम असत. म्हणून वेळ कधी केव्हा मिळेल सांगता येत नाही. पण theme छान होती. शेतकऱ्यांच्या जीवनावर अभिनय असल्यामुळे त्यातील खरेपणा दाखवायला प्रत्येक जण जीव तोडून मेहनत घेत होता.

स्क्रीनिंग करून आम्हाला रोल दिले गेले. मला शेतकऱ्याचा रोल मिळाला तो मी विष पिऊन मरण्याची अक्टिंग छान करतो म्हणून. मी खुश! आता लक्षात येतंय कि मी जर कशावर जास्त मेहेनत घेतली असेल तर त्या शेतकऱ्याची आत्महत्या प्रभावीपणे दाखवण्यावर. theme सादर करायला आम्हाला फक्त ९ मिनिट होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात काम करणं, वादळी पाऊस येऊन पिक नष्ट होणे, सावकाराकडून कर्ज घेणे, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणे आणि पिक हाताशी येताच सावकाराची दादागिरी, आमचा शेतमाल हिसकावून नेणे आणि हताश शेतकऱ्याची आत्महत्या इतकं सगळं दाखवायचं होतं. रंगमंचावर अभिनय करताना तोंडाला पूर्ण पांढरा आणि डोळ्याभोवती काळा रंग लावण्यात येणार होते जेणेकरून चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे दिसून येतील.

३१ डिसेंबरला मित्रांसोबत जेवण करून दोन पौलाच्या जेट्टीवर आतिषबाजी पाहायला गेलो होतो. सोबत गप्पा, चेष्टा, मंद सुरातील गाणी  आणि समोर आतिषबाजी ह्यांच्या साथीत 2010 ला निरोप दिला. का माहित नाही पण दर वर्षी ३१ डिसेंबरला मन जसं संपूर्ण वर्षाची time-travel  करून  येत तसं ह्यावेळी वाटलं नाही. कदाचित tv नावाच्या वस्तूपासून महिनाभर दूर असल्याचा परिणाम असावा.


१ जानेवारी NIOFoundationDay  असतो. सणाचा उत्साह, अभिनंदनाचा वर्षाव, आणि सगळ्यांनी एकत्र काम करताना काळजीपूर्वक जपलेलं team स्पिरीट, असं वातावरण मला आधी कोणत्याच lab मध्ये दिसला नव्हतं.संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, fun games  आणि शेवटी dinner . Perfect ....!!

स्टेजवर परफॉर्मकरताना काहीच जाणवलं नाही. माझ्या रोलमध्ये शिरल्यावर acting  कशी झाली माहित नाही, पण शो छान झाला इतकं नक्की. श्रीरामची शेवटची कॉमेंट मला सगळं काही देऊन गेली. "अरे where is that fellow Damodar ? "Since he committed sucide ,  I couldn 't stop crying , man ...!!"


"शेवटी कोणी पाणी भरलं माहित नाही, पण बहुतेक नळ चालू होता आपण निघालो तेव्हा.."

अजून पाणी प्रश्नावर काही ठराव पास होत नव्हता. मानवी मन पण अजब आहे.  समोर इतकं अथांग समुद्र पसरलेला असून घरातील पाण्याच्या नळाची किती काळजी वाटावी...!! आणि असेच विचार घरापासून लांब आल्यावरच यावेत ह्याचं काय कारण?? माहित नाही. ७.३० कधी वाजून गेले मलाच समजलं  नाही. चला वर्षाची सुरवात तर छान झाली....बघू आता शेवट कसा होतोय........?

NIO ची मुख्य इमारत .

(Special thanks to Ajay, my friend who clicked them all)