Popular Posts

Sunday, April 17, 2011

शब्दांचा कॅनव्हास कमी पडतो

शब्दांचा कॅन्ह्वास कमी पडतो.....

एकीकडे आई बाबाना मुकलेली अस्तित्वच हरवून गेलेली जपानमधली मुल पाहून

स्वार्थी आपमतलबी माणसांचा हिशोबी व्यवहार पाहून

आयुष्यातली न सुटणारी कोडी पाहून

मोकळेपणाच्या नावाखाली चाललेले अचकट व्यवहार पाहून

आसुसलेलं प्रेम गमावताना पाहून

शब्दांचा कॅनव्हास कमी पडतो.........

पापण्या फक्त झरत राहतात...

त्यांना कुठे कळतं कुठे थांबावं..

शब्दांचा कॅनव्हास कमी पडतो

Tuesday, March 1, 2011

(मला शीर्षकच सुचत नाही)

कानात कोंबून घुसवलेल्या इयर फोनमधली दणक्यात वाजणारी गाणी, बाजूला असलेल्या A/C आणि GC-MS ची घरघर आणि डोक्यात उडालेला विचारांचा प्रचंड गोंधळ..... रविवार रात्रीचे ११ वाजलेले आणि संपूर्ण जग weekend मनसोक्त जागून पुढच्या आठवड्याची स्वप्नं कुशीत घेऊन झोपायला गेलेलं असतं आणि मी lab मध्ये अजून काही राहिलेल्या गोष्टींवर मेहनत घेत असतो. मागच्या ४ आठवड्यातली तीच process पुन्हा करण्याची हि माझी ४ थी वेळ. मन सांगत असतं "DON'T GIVE-UP ", आणि शरीर खोडकर मुलासारखं "त्यातून काही short-cuts काढता येत असतील तर बघ....अजून कितीदा अपयश स्वीकारणार आहेस???" म्हणून खिजवत असतं. मनाच्या आणि शरीराच्या ह्या संगमावर बसून मी आपला "ह्यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघत असेल...फक्त माझी नजर तिथे असली पाहिजे" म्हणत पुन्हा प्रयत्न करण्याची माझी नाव हाकत राहतो.

आता मुळातच माझ्या argument  मध्ये एक मलाही न समजलेलं कोड दडलाय...आपल्याच मनाचे सकारात्मक आणि नकारात्मक अशे दोन प्रकार असतील तर मग निर्णय घेणारा कोणता भाग??? आणि मग "मी" नावाचा जो कोणी असतो तो कोण???? म्हणून मी त्याला माझ्या सोयी साठी मन आणि शरीर अशी नावं दिलीयेत.... इथे मला "Angels & Demons" चित्रपटाचं banner आठवतंय (चित्रपट मूळ कादंबरीच्या दर्जाच्या जवळपासही फिरकत नाही पण हे चित्र माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलंय.) माझा लाडका अभिनेता Tom Hanks (त्यानं साकारलेलं माझा अतिशय आवडतं  पात्र म्हणजे Robert langdon ) देवदूत (Angels ) आणि सैतान (Demons ) ह्यांच्या मध्ये उभा राहिलाय आणि त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे प्रचंड मोठे भाव आहेत. मला राहून राहून वाटत राहत कि ते चित्र म्हणजे मानवी जीवनातील  सदैव  चालणाऱ्या  द्वंद्वाच  प्रतिक  आहे  कि काय. कदाचित angels, demons, चांगल, वाईट, प्रेम संताप वगैरे असं काहीच नासावं. गोष्टी फक्त असतात....चांगल्या वाईट वगैरे लेबल आपण त्याना लावतो....पण शेवटी काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा हे ठरवणारा फक्त माणूसच असतो. आणि त्याला त्या त्या मार्गावरून चालण्याची बक्षिसं आणि फळं दोन्ही निमुटपणे भोगायची असतात.

आत्ता हे लिहिताना पण माझ्या अंगावर काटा उभा राहतोय आणि मनात कुठेतरी सुधीर फडकेंनी गायलेलं गीत रामायणातला  "दैव जात दुखे भरता...दोष न कुणाचा...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..दोष न कुणाचा" हे गाणं फुल volume वर प्ले होतंय. हे गाणं मी आजवर निदान १०० हून जास्त वेळा ऐकलय पण त्याची गोडी काही संपत नाही......कदाचित आयुष्यात मला स्वतालाच ह्या ओळींचा अनुभव आला असल्याने हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असेल.....माहित नाही... पण खरच वाटतंय कि आयुष्य कितीही सकारात्मक पद्धतीने जगू ..निराशेचा लवलेशसुद्धा येऊ देणार नाही म्हणलं तरी बऱ्याच प्रसंगात त्रास होतो...मन मारून पुढे जावं लागतं आणि "माझी काहीच चूक नसताना हे असंच का" चं उत्तर सापडत नाही....आणि मग आयुष्याचा प्रवास एक कठोर शिक्षा वाटून जातो. कदाचित तेव्हाच निष्काम कर्मयोगाची महती समजू लागते...आनंद आणि दुखाकडे सारख्याच नजरेने आणि तीव्रतेने पाहत...DETACHED होवून आयुष्य कसं जगता येतं ते हळू हळू समजत जातं. म्हणलं तर मानवी जीवन दुख, अपयश, निराशा, अपेक्षाभंग ह्यांच्यासारख्या काट्यांनी खच्चून भरलंय. पण त्यातून सुद्धा हास्य, समाधान आणि जीवनाकडे पाहण्याचा आनंदी दृष्टीकोन घेऊन जीवनात आनंदाचे निदान ताटवे तरी नक्कीच फुलवता येऊ शकतात.....पण त्यातही प्रयत्न करत राहणं हेच माणसाच्या हातात आहे हे हि तितकच खरं.

आता मी परत माझ्या मूळ प्रश्नाकडे येतोय.."मी" म्हणजे कोण???????????????????????

आजवर शिकलेली  Cell & Molecular Biology, Embryology, Genetics तोकडी पडते, बुद्धी हताशपणे "No results found on the query you entered" चा message flash करते. आणि मी पुन्हा भगवत गीता उघडतो. Proteins, Fats, Lipids, DNA, Water ह्यांनी बनलेला एक organized human being.....product of 4.5 millions of evolution हि व्याख्या मुस्कटात मारावी तशी फाडकन डोक्यात येते पण समोर भगवत गीता तर आत्म्याचं अस्तित्व, "नैनं चिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः...नाचैनाम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः" अश्या शब्दात वर्णीत करत जाते.....(असंभव serial चा title track मला आवडण्याचा आणखी एक कारण...तसाही पल्लवी जोशी चा मी अशक्य fan असल्याने तिनं केलेलं काहीही मी वेड्यासारखा पाहायचो....असो ते एक वय होता ज्यात अश्या सगळ्या गोष्टी करायच्याच असतात...नाहीतर पाप लागतं......असो, तर, चावटपणा पुरे झाला.) पण हे जे व्यक्त न करता येण्याजोगं पण स्फुट असं अस्तित्व असतं त्यालाच कदाचित "मी" म्हणत असावेत असं मला वाटतं. आणि ह्या त्याच "मी" ला आपण Commander-in-charge बनवलेलं असतं...आता हा "मी" त्या "परमेश्वर" नावाच्या गोष्टीसोबत तादात्म्य पावलेल्या अवस्थेत, सुख दुखाकडे समान नजरेने पाहत, सदैव राहावा इतकंच वाटत राहत. ह्यातूनच मला उमगलेल्या निष्काम कर्माचा पहिला अध्याय सुरु होतो.....

Enhanced by ZemantaEnhanced by Zemanta 

Saturday, February 26, 2011

Why does life suck sometimes.........???????????


I've a question- as always- why are there so many depressing moments in our life? Why people are so harsh to you sometimes even if your mistake is vary small one? Why things don't always seem to be falling in place even though you try &; give your 200%? I remember a nice song from a Hindi movie (i forgot the name). The lyrics goes like
"Ishwar allah tere jahaan mein nafarat kyun hai jang hai kyun...tera dil to itna bada hai..insaan ka dil tang hai kyun??....Kadam kadam par sarahad kyun hai sari jameen toh teri hai....is duniyan ke daman par insaan ke lahu ka rang hai kyun??...."

The song goes on &; never fails to mesmerize me or should I say never fails to take me in the Contemplation mode!! Like the still scenes from a movie, many images slid in front of me. What is there in it?? Many occasions at which I was beaten up, not because of my fault but somebody Else's, many times when somebody- with whom I had no issues at all- seems to talk like settling some personal scores with me &; I couldn't do a damn to him, those moments when I wished for hearing for something positive & god made me hear quintessential negative things & NOs, all those memories of sad moments when I felt like being dragged by life (which is so unusual to me) to just nowhere (or in the trench of sadness- if at all somewhere).


I think..... at those moments, god or thermodynamics, whatever you like to call, wants me to go through those tough roads so that  I'll get more stronger by the end of those roads. The tears I shed, would return to me becoming the sweet pools of water to energise me back.

Moreover, I feel that at times when life sucks, pat your own back at times when you do small but good things & avoided the path of sins, &; cruelty. You might have done small thing-no matter how small- never forget to cheer yourself up. You know, when our mind makes us do wrong things, sins, we feel guilty &; scold our mind. But do you remember the occasions when you had done something good, some charity, showed some compassion had you congratulated yourself up for not choosing to do opposite of it?? If no, start it from now on, because you are reading a good blog instead of something bad on the Internet which can also be as easily accessible as this blog.

And lastly, about depressing moments, learn what the crux of the matter that time wanted to teach you, talk to someone you love the most, forget those people &; moments which spoiled your life, rather wish them all the best &; take on your life with a new energy. The life will be very beautiful.

(I would like to mention with all the humility & modesty that this is easier said than done)

God bless you...!!!!

Saturday, January 29, 2011

विचार....

बरेच दिवस झाले डोक्यात एक विचार फार ताप देतोय....माणसाला विचार आणि स्मृती ह्यांची खरच किती गरज असते.........? आणि जर त्या नसतील तर काही मोठा फरक पडणार आहे का?

काही दिवसांपूर्वी "50 फस्ट डेट्स" चित्रपट पहिला...खरं सांगतो, चित्रपट इतका अप्रतिम आहे कि अंगावर रोमांच उभे राहावेत किंवा डोळ्यातून पाणी यावं....मराठी चित्रपट "गोजिरी" पहिला असेल तर कथानक लक्षात येईलच....एका अपघातात short term memory loss  झालेली तरुणी आणि तिचा मनापासून सांभाळ करणारे तिचे नातेवाईक ....तिच्या मनापासून प्रेमात पडणारा नायक जो तिला भेटण्या आधी नाती..प्रेम...आणि एकंदरीतच स्त्रियांकडे मजा म्हणून पाहणारा आणि हि आयुष्यात आल्यानंतर तिला रोज आपल्या प्रेमात पडणारा (आणि पाणावलेल्या आपल्या  डोळ्यांच्या कडातून मनापासून येणारी आपली दाद घेऊन जाणारा) खराखुरा नायक...आणि अशक्य वाटावं इतकं त्या दोघांचं एकमेकांवरच प्रेम...


चित्रपट संपतो आणि माझ्या ओल्या पापण्याच्या अडून एक मनाचा प्रवास सुरु होतो.....मानवी मन, त्याच्या अनेक कडा, मानवी भावना, नाती आणि सरते शेवटी विचार आणि स्मृती ह्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान ह्यापाशी येऊन हा प्रवास थांबतो ... मी तशाच काहीशा न सावरलेल्या अवस्थेत ह्या मोठ्या jig saw puzzle ची मांडणी करायला लागतो....आता पुढे काही लिहित जाणार आहे त्याला काही निश्चित आणि मानवी चौकटीत बांधलेला निष्कर्ष येणार नाही पण मनात खूप विचार आले कि ब्लॉग लिहिणं सोयीस्कर वाटतं.

एक समाज, त्या सोबत येणारी आचार विचारांची चौकट, आणि दुर्दैवाने त्यासोबत येणारी बंधनं जी माणसाचं अख्खं जीवनच जखडून टाकतात...ह्या सगळ्याचा उगम माणसाच्या विचार करण्याच्या आणि स्मृती साठवण्याच्या प्रकृतीशी संबंधित आहे कि काय अशी शंका येते...काही स्मृती खरच निघून गेल्या तर छानच वाटणार असतं....नव्हे  कधी कधी तर काही स्मृती जपण्यापेक्षा फेकून दिलेल्या चांगल्या इथवर मनाची मजल गेलेली असते....आणि विचारांबद्दल काय बोलू...इतक्या प्रकारचे आणि अनंत ताऱ्हांचे विचार माणूस म्हणून आपल्या आयुष्यात असतात कि कधी कधी शंका येते कि माणसाचं जीवन कृतींपेक्षा विचारांनीच भरलेलं आहे काय...?????

ह्या दोन्ही गोष्टी मानवी जीवनातून वजा केल्या तर आयुष्य निदान "झेपेल" तरी..अर्थात मला इथे विचार आणि स्मृती गेल्यावर येणारा स्वैराचार अभिप्रेत नाही हि गोष्ट वेगळी.....पण तरीही पोकळी आणि धुंदी ह्या आपल्यातून कायमच्याच निघून जातील......नवीन वयात आलेल्या मुलाला (ज्याला अजून तारुण्य उपभोगायच म्हणजे काय हे पण समजलेलं नसतं) त्याच्या भावी करियरबद्दल बोलताना ऐका म्हणजे विचारांची आयुष्यावर बसलेली मगरमिठी जाणवेल.....आणि स्मृतींबद्दल काय सांगणार.....आपल्याला सोडून गेलेली मुलं त्यांच्या आयुष्यात आनंदात आहेत हे एकमेकांना अभिमानाने सांगणारे "एकटे" आई वडील पहा...

कधीकधी असं वाटत कि ह्या गोष्टी आयुष्यातून निघून गेल्या तर रोज एक "नवा" दिवस अनुभवता येईल...त्या दिवशी मिळणारा सुखद अनुभव, अपेक्षाभंगातून येणारी निराशा, यशाची धुंदी.....सगळं सगळं रात्री १२ च्या ठोक्याला संपून जाईल....आयुष्याच्या कधीच न कळणाऱ्या बेरजा वजाबाक्या फक्त त्या दिवसापुरत्या मर्यादित राहतील ....पण असं खरच होईल का????????? होणार नसेल तर can i at least have a delete button....?

Tuesday, January 4, 2011

डायरीच्या (खरडलेल्या) शेवटच्या पानांतून.

"आहो, बहुतेक नळ बंद करायचा राहून गेला वाटत हो...!!!"

दोना पौला च्या शांत समुद्रकिनारवर एक कर्तव्यदक्ष गृहिणीचे चिंतातुर उद्गार ऐकून मी विचारातून बाहेर आलो.
"६.३० PM , २ जानेवारी २०११"
घड्याळ नेहमी आपला कम करत रहत. आपल्याला आवडो अगर न आवडो. संधिप्रकाश संपून हवेत गारठा भरायला लागला होता. मी मात्र अजुन माझ्या विचारत होतो. मागचा संपूर्ण आठवडा माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता.

"१ जानेवारी को NIO Foundation Day हैं, उसमे हमको mime करने का मौका मिल रहा हैं. चालो ना participate करते हैं..!!" माझा मित्र अवनीश २५ डिसेंबरच्या संध्याकाळी असाच काहीतरी बडबडत होता. आम्ही सगळे कट्ट्यावर गप्पा मारत असताना ह्याला सकाळी कोणीतरी mime साठी विचारल्याची आठवण झाली होती. सगळे थोडे light मूड मध्ये असताना साहेबांनी डोक्यात खूळ घेतला होतं. सगळी gang दिवसभर क्रिकेट खेळून दमली होती त्यामुळे कोणीच पटकन reaction देण्याच्या अवस्थेत नव्हत. थोडं हो, नाही, बघू, वगैरे अस्सल भारतीय प्रतिक्रिया देऊन झाल्यावर ठरलं, कि चला जाऊन पाहू तरी कि काय भानगड आहे ते.



२५ डिसेंबर, गोव्यात क्रिसमस फिवर जबरदस्त असतो. मला कल्पना नव्हती की मलाही ह्या वर्षी क्रिसमस एन्जोय करायला मिळेल म्हणून. ह्या वर्षी विद्यापीठातील माझ्या department च्या M . Sc . I मध्ये एक जर्मन student आली आहे. तिचं नाव कार्ला. मी स्वतः कधी जुनियर सिनियर अश्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे नवीन मित्र-मैत्रिणी जोडायला कधीच अडचण आली नाही. तशीच कार्लाशीही मैत्री झाली. हळू हळू जुलिया, स्टेफीन पण दोस्त झाले. तर हि सगळी मंडळी, आणि कार्लाची family ह्या क्रिसमस ला गोव्यात आले. मी पण research साठी गोव्यात असल्याने त्यांच्याकडून आग्रहाचं निमंत्रण मिळाल. २५ डिसेंबर खरचच rocking होता. सकाळी बोट रायडींग, दुपारी जर्मन पद्धतीचं जेवण (अर्थतच शाकाहारी) आणि संध्याकाळी गिफ्ट्स. माझ्याच देशात पाहुण्यांकडून मिळणाऱ्या प्रेमळ पाहुणचाराने मी भारावून गेलो होतो. वागातोर पासून NIO colony मध्ये यायला रात्रीचे ८.३० झाले होते; आणि आल्यावर mime नावाचा प्रकार करण्यासाठी निमंत्रण मिळालं होत.असा समाधानयुक्त थकवा घेऊन मिमेम्हन्जे काय ते समजून घ्यायला गेलो....
 

"अब mime में आपको सिर्फ facial expressions से अपना topic present  करना होता हैं. mime मतलब मूक अभिनय. No voice , & नो words ; nothing  artificial ". आमचा director बनलेला श्रीराम सांगत होता. अस्सल दक्षिणात्य कुरळे केस, रुंद कपाळ, मोठे डोळे आणि बोलण्यात दक्षिणी हेल काढून बोलायची सवय! डिरेक्टर म्हणून श्रीराम चांगला होता. त्याचं वागणं बोलणं व्यक्तिमत्वातील संतुलित मनाची ग्वाही देत होतं. श्रीराम ८ वी पासून mimes करतोय. आमच्यातील बेस्ट काढून घेण्यात श्रीराम तरबेज होता. आता खरी समस्या होती ती तयारीसाठी वेळ काढण्याची. सगळे हॉस्टेलवरच राहतात तरीपण प्रत्येकाला त्याच्या त्याचा lab मध्ये भरपूर काम असत. म्हणून वेळ कधी केव्हा मिळेल सांगता येत नाही. पण theme छान होती. शेतकऱ्यांच्या जीवनावर अभिनय असल्यामुळे त्यातील खरेपणा दाखवायला प्रत्येक जण जीव तोडून मेहनत घेत होता.

स्क्रीनिंग करून आम्हाला रोल दिले गेले. मला शेतकऱ्याचा रोल मिळाला तो मी विष पिऊन मरण्याची अक्टिंग छान करतो म्हणून. मी खुश! आता लक्षात येतंय कि मी जर कशावर जास्त मेहेनत घेतली असेल तर त्या शेतकऱ्याची आत्महत्या प्रभावीपणे दाखवण्यावर. theme सादर करायला आम्हाला फक्त ९ मिनिट होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतात काम करणं, वादळी पाऊस येऊन पिक नष्ट होणे, सावकाराकडून कर्ज घेणे, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणे आणि पिक हाताशी येताच सावकाराची दादागिरी, आमचा शेतमाल हिसकावून नेणे आणि हताश शेतकऱ्याची आत्महत्या इतकं सगळं दाखवायचं होतं. रंगमंचावर अभिनय करताना तोंडाला पूर्ण पांढरा आणि डोळ्याभोवती काळा रंग लावण्यात येणार होते जेणेकरून चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे दिसून येतील.

३१ डिसेंबरला मित्रांसोबत जेवण करून दोन पौलाच्या जेट्टीवर आतिषबाजी पाहायला गेलो होतो. सोबत गप्पा, चेष्टा, मंद सुरातील गाणी  आणि समोर आतिषबाजी ह्यांच्या साथीत 2010 ला निरोप दिला. का माहित नाही पण दर वर्षी ३१ डिसेंबरला मन जसं संपूर्ण वर्षाची time-travel  करून  येत तसं ह्यावेळी वाटलं नाही. कदाचित tv नावाच्या वस्तूपासून महिनाभर दूर असल्याचा परिणाम असावा.


१ जानेवारी NIOFoundationDay  असतो. सणाचा उत्साह, अभिनंदनाचा वर्षाव, आणि सगळ्यांनी एकत्र काम करताना काळजीपूर्वक जपलेलं team स्पिरीट, असं वातावरण मला आधी कोणत्याच lab मध्ये दिसला नव्हतं.संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, fun games  आणि शेवटी dinner . Perfect ....!!

स्टेजवर परफॉर्मकरताना काहीच जाणवलं नाही. माझ्या रोलमध्ये शिरल्यावर acting  कशी झाली माहित नाही, पण शो छान झाला इतकं नक्की. श्रीरामची शेवटची कॉमेंट मला सगळं काही देऊन गेली. "अरे where is that fellow Damodar ? "Since he committed sucide ,  I couldn 't stop crying , man ...!!"


"शेवटी कोणी पाणी भरलं माहित नाही, पण बहुतेक नळ चालू होता आपण निघालो तेव्हा.."

अजून पाणी प्रश्नावर काही ठराव पास होत नव्हता. मानवी मन पण अजब आहे.  समोर इतकं अथांग समुद्र पसरलेला असून घरातील पाण्याच्या नळाची किती काळजी वाटावी...!! आणि असेच विचार घरापासून लांब आल्यावरच यावेत ह्याचं काय कारण?? माहित नाही. ७.३० कधी वाजून गेले मलाच समजलं  नाही. चला वर्षाची सुरवात तर छान झाली....बघू आता शेवट कसा होतोय........?

NIO ची मुख्य इमारत .

(Special thanks to Ajay, my friend who clicked them all)

Thursday, November 25, 2010

वेध Dissertation चे....!!

खरं तर हा ब्लॉग लिहिताना माझी परीक्षा चालू आहे. आता माझी परीक्षा चालू आहे हे सांगायला लागते हे सुद्धा एक गमतीशीर कोडे आहे. म्हणावे तर परीक्षा चालू असून पण ब्लॉग लिहिण्याची धडपड करणारा एकतर Einstein असू शकतो किंवा ठार वेडा आणि उनाड. मी जास्त करून दुसरया category त मोडतो हे सुज्ञास सांगणे न लगे....! असो...!! तर, आश्या ह्या तीच तीच परीक्षा देऊन थकलेल्या माझ्या जीवाला चार विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून मी आपला काही बाही लिहिण्याचे प्रयत्न करतोय.

सध्या परीक्षा चालू असल्याने जीवनात पुन्हा कधीही न मिळणारी झोप मी सुखाने भोगतोय..!! आता या नंतर पुन्हा विद्यापीठ परीक्षा घ्यायला मानगुटीवर बसणार नाही ह्या कल्पनेनेच अंगावर गुलाबी रोमांच उभा राहतोय... (सध्या तशी गुलाबी थंडीही पडायला लागली आहे. असो फारच गुलाबी होत चालंय) पुणे विद्यापीठातून पर्यावरण शास्त्राची पदवीत्तर पदवी (मला post graduation म्हणायचे आहे) घेण्यासाठीचा शेवटचा सोपस्कार म्हणजे ६ महिन्यांचा प्रकल्प/dissertation . म्हणलं तर मजा आणि म्हणलं तर सजा अशा काटेरी कुंपणावर उभा असलेला ६ महिन्यांचा काळ जीवनात आता खूप मोलाचा ठरणार आहे. स्वताच्या गावकुसाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी भोगलेले क्षण आता आमच्या वाट्याला येणार आहेत. कामाचं प्लानिंग आणि छान सराईत अंमलबजावणी यांची भट्टी कधी न्हवे इतकी उत्तम जुळून आली आणि आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, गोवा इथे जाण्यासी सिद्ध जाहलो.....!!

हे dissertation आम्हाला काय देत नाही...?? प्रत्यक्ष कामाचं अनुभव, वैज्ञानिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, देशातील प्रख्यात वैज्ञानिकांशी जवळीक साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी आणि असं बराच काही. मी ह्या वर्षीच्या तळपत्या उन्हाळ्यात summer internship (research) साठी तिथेच होतो, त्यावेळी मला  यासाठी सुचलेला नाव म्हणजे "२१ व्या शतकातील आधुनिक गुरुकुलच". घराबाहेर राहून काटकसरीने आणि तरीपण जिद्दीने नवीन गोष्टी समजून घेण्याची, शिकून घेण्याची जी उमेद तयार होते त्याला तोड नाही...!

गोव्याला जाण म्हणजे पुन्हा कादंब volvo चा प्रवास, पणजीमधली तीच चिकचिक, स्वतःच समान, असलीच तर छत्री आणि मुख्य म्हणजे मनाचा तोल सावरत दोनपौलाला जाणारी बस शोधणं, त्यात चढणं, मिळालीच तर सीटवर बसणं आणि खूप सावकाश driving  करणाऱ्या चालकाकडे हतबल पाणे पाहणं हे सुद्धा मोठं दिव्य आहे......(भलेभले हार मानतील ......असलं एखादं पुणेरी वाक्य टाकून भाव खायला आम्ही मोकळे)

गोवा म्हणजे नितांत सुंदर निसर्ग, गोवा म्हणजे निळाशार समुद्रकिनारा, देहावरून अलगद जाणार हवेचा मंद झोत, अवखळ लाटा  हे सगळं सोडून गोव्याचं असलं काहीतरी दळभद्री वर्णन केल्याबद्दल काही रसिक वाचक घोर निराश होतील. पण खरं सांगतो, गोव्याची मजा दोन-चार आठवड्यातच संपते. ब्राम्हण आहे त्यामुळे देशी, विदेशी, परलोकाची वगैरे घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे तिथे होणारे शाकाहारी जेवणाचे हाल शब्दांत मांडता येत नाहीत. तर आसा सगळा नितांत सुंदर वगैरे असलेला गोवा भटकून २-३ आठवडे होतात तोच तिथल्या "सुशाकाचा" कंटाळा येऊ लागतो...!

सोबत एखाद पुस्तक (मी या बाबतीत पण खादाड असल्याने मला ३-४) अथवा laptop वर निदान२५-३० सुंदर (खऱ्या  अर्थाने.....हो, हे पण सांगावं लागतं, नाहीतर सुंदर चे हि भयानक अनर्थ घेतले जातात.) चित्रपट असतील तर सोने पे सुहागा. पण मनापासून सांगतो, आपलं संशोधन छान चालंय, आपल्याला हवे ते निष्कर्ष मिळतायत हे लक्षात येऊन जे समाधान मिळतं त्याची तोड कशालाही नाही! जसं ते सुख दुर्मिळ तसं ते सुख असण्याचं नशिबही अत्यंत दुर्मिळ...! असो, संशोधन करताना हे असं होणारच..! आणि होस्टेल लाइफ बद्दल तर काय लिहू..!! समोरच्या ताटातील न तुटणाऱ्या पोळ्या खुशखुशीत मैत्रीच्या नादात कधी संपतात हे मेसवाल्याच्याही लक्षात येत नाही...!

मला ह्यावेळी तिथल्या badminton court  वर  मनसोक्त badminton खेळायचं आहे. पायाची लचक गेल्याने मी पण आता नव्या जोमात खेळायला तयार आहे. पुन्हा एकवार मला स्वतःला शोधायचं आहे, आनंदात नाचणारा, मित्राच्या डोक्यावर टपली मारून सुख दुःखाचा sharing करणारा, स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधणारा आणि स्वतःच्या नावाचं research article असावं म्हणून धडपडणारा दामोदर मला एकचित्त होऊन अनुभवायचा आहे..!! मला आता तिथे जाऊन काम करायची सुरसुरी चढली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे हा ब्लॉग...!!

अटलजींच्या "आओ फिरसे दिया जलाये" या कवितेच्या काही ओळी आठवतायत. यु tube  चे आभार म्हणूनच हि लिंक share करू शकतोय...

http://www.youtube.com/watch?v=VO7EXAxUEAI&feature=related

तर आता निरोप घ्यायची वेळ आली....पुन्हा पुढच्यावेळी भेटू....एका नवीन उमेदिसह...!

Wednesday, September 1, 2010

The Saffron: To make sense of it all..!!

Indian politician Palaniappan Chidambaram. Tak...Image via Wikipedia
One of the factors about Indian Politics which worries me a a lot is the use of color, caste & religion for the political gains. Its not just the governing people but so called responsible opposition too can't resists itself to get tainted in the allegations. The regional clashes in Maharashtra & State government's inability to create a tensions free democracy are the most latest versions of it's kind. What adds more to the concern is the large number of  people who patronage such beliefs are unaware what a monster they are nursing.
Couple of days ago when I read about the remarks made by the Honorable Home Minister P. Chidambaram regarding the threat of - what he & his party apparently seems to be deeming - 'The Saffron Terror". I wonder how & since when the Congress started attaching the color labels to the terror aspects.

Let me take on this one by one.

A. Terrorism is a color blind's business-

People who raise the guns, nukes, & other mass destructive weapons are not the ones who are following the great verses or practicing the sacred commandments from the great books. Because no religious philosophies advocate such a business of massacring innocents. I believe anyone will agree to it that every political establishments across the world have accepted it. If India really considers itself to be a great democracy & Secular Republic, such a religionists statements don't suit a responsible cabinet minister on the floor of the Parliament.

If we consider the problem of terrorism faced by India, it is largely coming of Pakistan & now a days patronage d by China. These are not the simple allegations but there have been growing evidences in this regard & there is no denying the fact that even Mr. Obama won't rule out Pakistan's hand in supporting terrorism. I am not crossing the line by attributing any color to the terrorism faced by India. As I've mentioned, terrorism is just the color blind's game..!!

In the domestic troubles, problem of Naxalites is the prominent one & there has been a very slow progress in this regard to curb it & provide the residents of Red Corridor a free & fearless life. In this respect, lot more is expected from the Congress-led UPA Government. If the home ministry can't even get permissions to use helicopters & firing on the Naxalites if caught making violence, we got to admit that P. Chidambaram needs to do lot more than just pointing out new brilliant color-codes.

B. India's Challenges-

Even if you would scratch up a moss in the Indian territory, you would surely find someone advocating his/ her own theory about the problems India is facing today & will also give you solutions to tackle those problems, free of cost..!! (Don't ask me if mosses really flourish in India's famous hot & dusty climate..) So, I don't want to add something to that neither I've got any such intension. But it is largely evident fact that if any threat to the India's security is there, it is largely from Maoists, Naxalites separatists, & radicalists present in the national territories. So, having conveniently forgotten them all Honorable minister sights Saffron terrorism as a major threat. Sad..!

So, the point it has led me to, is there are other issues - much bigger than this - needing careful attention rather than making some cheap political stunts for the sake of vote banks...! Saffron is the color of sacrifice & it is there on our national flag  quite rightly. If at all Home ministry has some evidences of so called Hindus involved in crime, it is duty bound to bring them to justice & punishment. But this doesn't mean that there is a bigger threat of so called Saffron terror. By & large I view at this whole incidence as an event to catch the votes from non saffrons - if you are aware of what I mean. If this move succeeds, the unity of our nation is at stake. We can't afford to let this cheap political stunt succeed..


Related articles by Zemanta
Enhanced by Zemanta