खरं तर हा ब्लॉग लिहिताना माझी परीक्षा चालू आहे. आता माझी परीक्षा चालू आहे हे सांगायला लागते हे सुद्धा एक गमतीशीर कोडे आहे. म्हणावे तर परीक्षा चालू असून पण ब्लॉग लिहिण्याची धडपड करणारा एकतर Einstein असू शकतो किंवा ठार वेडा आणि उनाड. मी जास्त करून दुसरया category त मोडतो हे सुज्ञास सांगणे न लगे....! असो...!! तर, आश्या ह्या तीच तीच परीक्षा देऊन थकलेल्या माझ्या जीवाला चार विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून मी आपला काही बाही लिहिण्याचे प्रयत्न करतोय.
सध्या परीक्षा चालू असल्याने जीवनात पुन्हा कधीही न मिळणारी झोप मी सुखाने भोगतोय..!! आता या नंतर पुन्हा विद्यापीठ परीक्षा घ्यायला मानगुटीवर बसणार नाही ह्या कल्पनेनेच अंगावर गुलाबी रोमांच उभा राहतोय... (सध्या तशी गुलाबी थंडीही पडायला लागली आहे. असो फारच गुलाबी होत चालंय) पुणे विद्यापीठातून पर्यावरण शास्त्राची पदवीत्तर पदवी (मला post graduation म्हणायचे आहे) घेण्यासाठीचा शेवटचा सोपस्कार म्हणजे ६ महिन्यांचा प्रकल्प/dissertation . म्हणलं तर मजा आणि म्हणलं तर सजा अशा काटेरी कुंपणावर उभा असलेला ६ महिन्यांचा काळ जीवनात आता खूप मोलाचा ठरणार आहे. स्वताच्या गावकुसाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी भोगलेले क्षण आता आमच्या वाट्याला येणार आहेत. कामाचं प्लानिंग आणि छान सराईत अंमलबजावणी यांची भट्टी कधी न्हवे इतकी उत्तम जुळून आली आणि आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, गोवा इथे जाण्यासी सिद्ध जाहलो.....!!
हे dissertation आम्हाला काय देत नाही...?? प्रत्यक्ष कामाचं अनुभव, वैज्ञानिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, देशातील प्रख्यात वैज्ञानिकांशी जवळीक साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी आणि असं बराच काही. मी ह्या वर्षीच्या तळपत्या उन्हाळ्यात summer internship (research) साठी तिथेच होतो, त्यावेळी मला यासाठी सुचलेला नाव म्हणजे "२१ व्या शतकातील आधुनिक गुरुकुलच". घराबाहेर राहून काटकसरीने आणि तरीपण जिद्दीने नवीन गोष्टी समजून घेण्याची, शिकून घेण्याची जी उमेद तयार होते त्याला तोड नाही...!
गोव्याला जाण म्हणजे पुन्हा कादंब volvo चा प्रवास, पणजीमधली तीच चिकचिक, स्वतःच समान, असलीच तर छत्री आणि मुख्य म्हणजे मनाचा तोल सावरत दोनपौलाला जाणारी बस शोधणं, त्यात चढणं, मिळालीच तर सीटवर बसणं आणि खूप सावकाश driving करणाऱ्या चालकाकडे हतबल पाणे पाहणं हे सुद्धा मोठं दिव्य आहे......(भलेभले हार मानतील ......असलं एखादं पुणेरी वाक्य टाकून भाव खायला आम्ही मोकळे)
गोवा म्हणजे नितांत सुंदर निसर्ग, गोवा म्हणजे निळाशार समुद्रकिनारा, देहावरून अलगद जाणार हवेचा मंद झोत, अवखळ लाटा हे सगळं सोडून गोव्याचं असलं काहीतरी दळभद्री वर्णन केल्याबद्दल काही रसिक वाचक घोर निराश होतील. पण खरं सांगतो, गोव्याची मजा दोन-चार आठवड्यातच संपते. ब्राम्हण आहे त्यामुळे देशी, विदेशी, परलोकाची वगैरे घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे तिथे होणारे शाकाहारी जेवणाचे हाल शब्दांत मांडता येत नाहीत. तर आसा सगळा नितांत सुंदर वगैरे असलेला गोवा भटकून २-३ आठवडे होतात तोच तिथल्या "सुशाकाचा" कंटाळा येऊ लागतो...!
सोबत एखाद पुस्तक (मी या बाबतीत पण खादाड असल्याने मला ३-४) अथवा laptop वर निदान२५-३० सुंदर (खऱ्या अर्थाने.....हो, हे पण सांगावं लागतं, नाहीतर सुंदर चे हि भयानक अनर्थ घेतले जातात.) चित्रपट असतील तर सोने पे सुहागा. पण मनापासून सांगतो, आपलं संशोधन छान चालंय, आपल्याला हवे ते निष्कर्ष मिळतायत हे लक्षात येऊन जे समाधान मिळतं त्याची तोड कशालाही नाही! जसं ते सुख दुर्मिळ तसं ते सुख असण्याचं नशिबही अत्यंत दुर्मिळ...! असो, संशोधन करताना हे असं होणारच..! आणि होस्टेल लाइफ बद्दल तर काय लिहू..!! समोरच्या ताटातील न तुटणाऱ्या पोळ्या खुशखुशीत मैत्रीच्या नादात कधी संपतात हे मेसवाल्याच्याही लक्षात येत नाही...!
मला ह्यावेळी तिथल्या badminton court वर मनसोक्त badminton खेळायचं आहे. पायाची लचक गेल्याने मी पण आता नव्या जोमात खेळायला तयार आहे. पुन्हा एकवार मला स्वतःला शोधायचं आहे, आनंदात नाचणारा, मित्राच्या डोक्यावर टपली मारून सुख दुःखाचा sharing करणारा, स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधणारा आणि स्वतःच्या नावाचं research article असावं म्हणून धडपडणारा दामोदर मला एकचित्त होऊन अनुभवायचा आहे..!! मला आता तिथे जाऊन काम करायची सुरसुरी चढली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे हा ब्लॉग...!!
अटलजींच्या "आओ फिरसे दिया जलाये" या कवितेच्या काही ओळी आठवतायत. यु tube चे आभार म्हणूनच हि लिंक share करू शकतोय...
http://www.youtube.com/watch?v=VO7EXAxUEAI&feature=related
तर आता निरोप घ्यायची वेळ आली....पुन्हा पुढच्यावेळी भेटू....एका नवीन उमेदिसह...!
Chhhhan jamalay...!!! :)
ReplyDeleteall the best!
ReplyDeletetuzya 'shakahari jevnache haal' hya phrase cha arth mala nemka mahit ahe mhanun tula open invitation detey! u r anytime welcome at our plc! welcome to goa mhanne chuk ahe, i guess "welcome back' is apt!
wish u have a stay full of knowledge n fun
Nice way to describe you journey! Keep updating on regular basis.
ReplyDeleteAlso I do agree that Goa is not heaven for Veg people (even I have exp that).
Mandar
masta lihilaya
ReplyDeleteHey Damodar
ReplyDeleteI am so glad that you can experience hostel life for atleast some time. Take care, enjoy and keep writing.