Cover of Angels & Demons [Blu-ray]
कानात कोंबून घुसवलेल्या इयर फोनमधली दणक्यात वाजणारी गाणी, बाजूला असलेल्या A/C आणि GC-MS ची घरघर आणि डोक्यात उडालेला विचारांचा प्रचंड गोंधळ..... रविवार रात्रीचे ११ वाजलेले आणि संपूर्ण जग weekend मनसोक्त जागून पुढच्या आठवड्याची स्वप्नं कुशीत घेऊन झोपायला गेलेलं असतं आणि मी lab मध्ये अजून काही राहिलेल्या गोष्टींवर मेहनत घेत असतो. मागच्या ४ आठवड्यातली तीच process पुन्हा करण्याची हि माझी ४ थी वेळ. मन सांगत असतं "DON'T GIVE-UP ", आणि शरीर खोडकर मुलासारखं "त्यातून काही short-cuts काढता येत असतील तर बघ....अजून कितीदा अपयश स्वीकारणार आहेस???" म्हणून खिजवत असतं. मनाच्या आणि शरीराच्या ह्या संगमावर बसून मी आपला "ह्यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघत असेल...फक्त माझी नजर तिथे असली पाहिजे" म्हणत पुन्हा प्रयत्न करण्याची माझी नाव हाकत राहतो.
आता मुळातच माझ्या argument मध्ये एक मलाही न समजलेलं कोड दडलाय...आपल्याच मनाचे सकारात्मक आणि नकारात्मक अशे दोन प्रकार असतील तर मग निर्णय घेणारा कोणता भाग??? आणि मग "मी" नावाचा जो कोणी असतो तो कोण???? म्हणून मी त्याला माझ्या सोयी साठी मन आणि शरीर अशी नावं दिलीयेत.... इथे मला "Angels & Demons" चित्रपटाचं banner आठवतंय (चित्रपट मूळ कादंबरीच्या दर्जाच्या जवळपासही फिरकत नाही पण हे चित्र माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलंय.) माझा लाडका अभिनेता Tom Hanks (त्यानं साकारलेलं माझा अतिशय आवडतं पात्र म्हणजे Robert langdon ) देवदूत (Angels ) आणि सैतान (Demons ) ह्यांच्या मध्ये उभा राहिलाय आणि त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे प्रचंड मोठे भाव आहेत. मला राहून राहून वाटत राहत कि ते चित्र म्हणजे मानवी जीवनातील सदैव चालणाऱ्या द्वंद्वाच प्रतिक आहे कि काय. कदाचित angels, demons, चांगल, वाईट, प्रेम संताप वगैरे असं काहीच नासावं. गोष्टी फक्त असतात....चांगल्या वाईट वगैरे लेबल आपण त्याना लावतो....पण शेवटी काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा हे ठरवणारा फक्त माणूसच असतो. आणि त्याला त्या त्या मार्गावरून चालण्याची बक्षिसं आणि फळं दोन्ही निमुटपणे भोगायची असतात.
आत्ता हे लिहिताना पण माझ्या अंगावर काटा उभा राहतोय आणि मनात कुठेतरी सुधीर फडकेंनी गायलेलं गीत रामायणातला "दैव जात दुखे भरता...दोष न कुणाचा...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..दोष न कुणाचा" हे गाणं फुल volume वर प्ले होतंय. हे गाणं मी आजवर निदान १०० हून जास्त वेळा ऐकलय पण त्याची गोडी काही संपत नाही......कदाचित आयुष्यात मला स्वतालाच ह्या ओळींचा अनुभव आला असल्याने हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असेल.....माहित नाही... पण खरच वाटतंय कि आयुष्य कितीही सकारात्मक पद्धतीने जगू ..निराशेचा लवलेशसुद्धा येऊ देणार नाही म्हणलं तरी बऱ्याच प्रसंगात त्रास होतो...मन मारून पुढे जावं लागतं आणि "माझी काहीच चूक नसताना हे असंच का" चं उत्तर सापडत नाही....आणि मग आयुष्याचा प्रवास एक कठोर शिक्षा वाटून जातो. कदाचित तेव्हाच निष्काम कर्मयोगाची महती समजू लागते...आनंद आणि दुखाकडे सारख्याच नजरेने आणि तीव्रतेने पाहत...DETACHED होवून आयुष्य कसं जगता येतं ते हळू हळू समजत जातं. म्हणलं तर मानवी जीवन दुख, अपयश, निराशा, अपेक्षाभंग ह्यांच्यासारख्या काट्यांनी खच्चून भरलंय. पण त्यातून सुद्धा हास्य, समाधान आणि जीवनाकडे पाहण्याचा आनंदी दृष्टीकोन घेऊन जीवनात आनंदाचे निदान ताटवे तरी नक्कीच फुलवता येऊ शकतात.....पण त्यातही प्रयत्न करत राहणं हेच माणसाच्या हातात आहे हे हि तितकच खरं.
आता मी परत माझ्या मूळ प्रश्नाकडे येतोय.."मी" म्हणजे कोण???????????????????????
आजवर शिकलेली Cell & Molecular Biology, Embryology, Genetics तोकडी पडते, बुद्धी हताशपणे "No results found on the query you entered" चा message flash करते. आणि मी पुन्हा भगवत गीता उघडतो. Proteins, Fats, Lipids, DNA, Water ह्यांनी बनलेला एक organized human being.....product of 4.5 millions of evolution हि व्याख्या मुस्कटात मारावी तशी फाडकन डोक्यात येते पण समोर भगवत गीता तर आत्म्याचं अस्तित्व, "नैनं चिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः...नाचैनाम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः" अश्या शब्दात वर्णीत करत जाते.....(असंभव serial चा title track मला आवडण्याचा आणखी एक कारण...तसाही पल्लवी जोशी चा मी अशक्य fan असल्याने तिनं केलेलं काहीही मी वेड्यासारखा पाहायचो....असो ते एक वय होता ज्यात अश्या सगळ्या गोष्टी करायच्याच असतात...नाहीतर पाप लागतं......असो, तर, चावटपणा पुरे झाला.) पण हे जे व्यक्त न करता येण्याजोगं पण स्फुट असं अस्तित्व असतं त्यालाच कदाचित "मी" म्हणत असावेत असं मला वाटतं. आणि ह्या त्याच "मी" ला आपण Commander-in-charge बनवलेलं असतं...आता हा "मी" त्या "परमेश्वर" नावाच्या गोष्टीसोबत तादात्म्य पावलेल्या अवस्थेत, सुख दुखाकडे समान नजरेने पाहत, सदैव राहावा इतकंच वाटत राहत. ह्यातूनच मला उमगलेल्या निष्काम कर्माचा पहिला अध्याय सुरु होतो.....